भाजप देवगड तालुका उपाध्यक्ष गोविंद सावंत यांची विकासकामे अपूर्ण ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
भाजप देवगड तालुका उपाध्यक्ष गोविंद सावंत यांची विकासकामे अपूर्ण ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
देवगड | ब्यूरो न्यूज : देवगड तालुक्यातल्या मुणगे गावातील आडबंदर रस्ता व मुणगे बौद्धवाडीतील बंधारा ही विकास कामे मागील सुमारे दीड वर्ष अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. पालकमंत्री ना. नितेश राणे, विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देतात. परंतु काही निष्क्रिय ठेकेदार अनेक कामे घेतात आणि सर्व कामे अर्धवट ठेवतात असा आरोप करत, अशा ठेकेदार व मजूर संस्थांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी भाजप देवगड तालुका उपाध्यक्ष गोविंद सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
मुणगे आडबंदर रस्ता गेल्या वर्षी बि. बि. एम. करून ठेवण्यात आला आहे. आजपर्यंत त्या रस्त्याकडे सदर ठेकेदाराने पुढील उर्वरित कामाबाबत कार्यवाही केलेली नाही. तसेच मुणगे बौद्धवाडीत पाणी साठवून ठेवण्याचा बंधारा आजही अपूर्ण आहे. संबंधीत विभागाने वरील दोन्ही कामांची दखल घेणे आवश्यक आहे. ही दोन्ही कामे आठ दिवसात पूर्ण न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी देवगड उपाध्यक्ष गोविंद सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सो...
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले दर्शन.
श्री. विनोद तावडे यांचे मुळ गावी श्री गणेश दर्शन.
श्री. विनोद तावडे यांचे मुळ गावी श्री गणेश दर्...