पळसंब येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव.
पळसंब येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव.
आचरा : मालवण तालुक्यातील श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ पळसंब यांच्यावतीने 'शिवजयंती उत्सवाचे' १९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ८ वाजता प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदेवतेस मुजरा करून उत्सवाला सुरुवात होणार आहे.
सकाळी ८:३० वाजता मर्दानी खेळ, ९ वाजता श्री. जयंतीदेवी मंदिर ते पळसंब शाळा शोभायात्रा, १० वाजता शिव प्रतिमा पूजन, १०:३० वाजता पळसंब शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांचे शिव समूह नृत्य व ११ वाजता मान्यवरांची मनोगते अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिवजयंती उत्सवाला सर्व ग्रामस्थ व महिला मंडळांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब (रजि.), श्री. जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ व सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती मंडळाच्या वतीने अध्यक्ष उल्हास सावंत यांनी दिली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाला उद्योजक डॉ. दीपक परब यांच्याकडून लॅपटॉप व प्रिंटर भेट.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
पळसंब येथील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.सरपं...
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदरमध्ये शालेय मुलांना वह्यांचे वाटप