मालवणात भाजपच्या वतीने नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार उत्साहात.
मालवणात भाजपच्या वतीने नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार उत्साहात.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, नगरसेवक मंदार केणी, ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, भालचंद्र उर्फ बबलू राऊत व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका भाजपच्या वतीने नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक यांचा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार समारंभ संपन्न झाला. सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे उत्साहात संपन्न झाला.
जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत ( शुभेच्छा व अभिनंदनपर मार्गदर्शक मनोगत करताना.)
यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, भालचंद्र उर्फ बबलू राऊत, नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक पंकज सादये, विजय निकम, महेंद्र चव्हाण, सौ. शिल्पा खोत, सौ. मसुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा विशेष सत्कार संपन्न.
नवनिर्वाचित मालवण नगरसेवक व नगरसेविका यांच्या सत्कारांचे क्षण
सत्काराच्या सोहळ्यात, मालवण नगरपरिषद निवडणुक २०२६ मध्ये विजयी झालेले नूतन नगरसेवक मंदार केणी, नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर, नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, नगरसेवक ललीत चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील विजयी भाजपा उमेदवारांच्या सत्काराचे क्षण.
जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सौ. क्षमा हडकर व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या श्रीम. सीमा परुळेकर (आडवली - मालडी), श्रीम. योजना कांबळी (कोळंब), श्रीम. माधुरी मसुरकर (वराड), श्री. संतोष गावडे (सुकळवाड), श्री. दिपक सुर्वे (चिंदर) व श्री. घनश्याम झाड (वायरी भूतनाथ) यांचा देखील शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात, सौ. शिल्पा खोत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर व मालवणचे नगरसेवक मंदार केणी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शुभेच्छा व अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस श्री. महेश मांजरेकर यांनी केले.
सोहळ्याचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भाजपा मालवण तालुकाध्यक्ष श्री. धोंडू चिंदरकर यांनी केले.
उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित सर्व भाजप लोकप्रतिनिधींच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...