स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या 'ई–कचरा जनजागृती व संकलन अभियान 2026' साठी दोन केंद्रांची निश्चिती.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या 'ई–कचरा जनजागृती व संकलन अभियान 2026' साठी दोन केंद्रांची निश्चिती.
महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत उपक्रम
प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांची माहिती.
मालवण | सानिका वायंगणकर : मालवणातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत PEHEL 2026 (Plastic and E-waste Handling for Ecofriendly Lifestyle) अंतर्गत ई–कचरा जनजागृती व संकलन अभियान 2026' राबविण्यात येत आहे.
समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे व ई – कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन व पुनर्वापर करणे या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने या उपक्रमासाठी दोन संकलन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रा डाॅ. सुमेधा नाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
या उपक्रमासाठी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण व वरची देवली, तालुका मालवण अशी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
नागरिकांनी त्यांच्या घरातील, वाडीतील, गावातील तसेच कार्यालये, दुकाने व उद्योगस्थळे येथील निष्क्रिय, खराब किंवा वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे २१ फेब्रुवारी २०२६ पूर्वी किंवा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित संकलन केंद्रात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, टी.व्ही., मायक्रोवेव्ह, वातानुकूलन यंत्र, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल फोन, चार्जर, पेन ड्राईव्ह, हेडफोन्स, डिजिटल/व्हिडिओ कॅमेरे तसेच इतर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणे स्वीकारली जाणार आहेत. मात्र ट्यूबलाइट, सी. एफ. एल., बल्ब व काच वस्तू स्विकारल्या जाणार नाहीत.
समाजातील सर्व घटकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या समन्वयक प्रा. डॉ. सुमेधा नाईक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी महाविद्यालय केंद्र : प्रा. डॉ. सुमेधा नाईक ( संपर्क क्रमांक - 9404924678), मेगल डिसोज़ा (8446128508) तसेच वरची देवली केंद्रासाठी, सौरभ नरेश चव्हाण ( 9309038676) यांच्याशी संपर्क साधता येऊ शकेल अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...