मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १९ फेब्रुवारीला डॉ. आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण.
मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १९ फेब्रुवारीला डॉ. आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण.
मालवण | प्रतिनिधी : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या मालवण शहर व परिसरातील शाळांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, सामाजिक न्याय विभाग व बार्टीचे मालवण तालुका समतादूत संग्राम कासले उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर तसेच बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व्यवस्थापन, परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच त्यांच्या शाळेचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.