ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.

चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर. 

Article image


शिवजयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिंदरच्या वतीने आयोजित शिबिराचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यायचे आवाहन.

 

श्री समीर लब्दे यांची माहिती.


ब्यूरो न्यूज : शिवजयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिंदर आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चिंदर येथील गावठणवाडी, सातेरी मंदिर जवळील मिलिंद चिंदरकर यांच्या निवासस्थानी होणार आहे. 


यावेळी नामवंत तज्ञ ऑप्टिशियन कडून संगणकीकृत तपासणी केली जाणार आहे. तसेच माफक दरात चष्मा देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ८२०८०२६२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा व सर्व पंचक्रोशीवासियांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पदाधिकारी समीर लब्दे यांनी या शिबिराबाबत माहिती दिली आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स