आंगणेवाडीतील सत्काराने पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर आणि सत्कारप्राप्त मान्यवर कृतकृत्य...!
आंगणेवाडीतील सत्काराने पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर आणि सत्कारप्राप्त मान्यवर कृतकृत्य...!
आंगणे वार्षिकोत्सव २०२६ मधील योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार.
आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आंगणेवाडी येथे अध्यक्ष सतिश उर्फ छोटू आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आंगणेवाडीत विशेष कार्यक्रमाला आंगणे कुटुंबिय व मान्यवर उपस्थित.
मसुरे | प्रतिनिधी : आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आंगणेवाडी येथे अध्यक्ष सतिश उर्फ छोटू आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आंगणेवाडीतील श्री. देवी भराडी माता वार्षिकोत्सव २०२६ मध्ये विशेष योगदान दिलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. मसुरे येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी, आंगणेवाडीतील ह्या विशेष सत्काराच्या प्राप्ती बद्दल कृतकृत्यता व्यक्त केली. श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी ह्या सत्काराबद्दल भावना व्यक्त करताना, 'आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील हा सत्कार हा जगत जननी श्रीदेवी आई भराडी मातेचा प्रसादच आहे आणि आई भराडी मातेच्या कृपा आशीर्वादाने आज आम्हा सर्वांना खूप काही मिळाले आहे,' अशा भावना व्यक्त केल्या. आंगणे परिवाराचे प्रेम नेहमी असंच पाठीशी राहू दे असे सांगून त्यांनी आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई या सर्वांचा मी ऋणी आहे अशा भावना व्यक्त केल्या.
आंगणेवाडी यात्रा उत्सवात विशेष कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांचे यात्रा उत्सवातील नियोजन हे सुयोग्य आणि भाविकांना लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी उपयुक्त असते. खरोखरच त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढेच थोडं आहे. प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय यांच्या संयुक्त अशा नियोजनातून भराडी मातेचा हा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात साजरा होतो. आज जो या ठिकाणी माझा सत्कार झाला याबाबत मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि देवीच्या आशीर्वादाने यापुढे सुद्धा मी पोलीस दलामध्ये चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
यावेळी आंगणे कुटुंबांच्या वतीने ज्येष्ठ नाटककार नरेंद्र आंगणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सांडव, युवा कार्यकर्ते देवेंद्र उर्फ आबा आंगणे,पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, डॉक्टर विश्वास साठे, डॉक्टर पटवेकर यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे, उपाध्यक्ष आनंदआंगणे, सरचिटणीस अर्जुन उर्फ काका आंगणे, बाळा आंगणे मधुकर आंगणे, प्रसाद आंगणे, गजानन आंगणे, समीर आंगणे, नंदू आंगणे, संकेत आंगणे,महेश पटेल, सचिन आंगणे, जयवंत आंगणे, तनुराज आंगणे, दिनेश आंगणे, बाबू आंगणे, कुणाल आंगणे, महेश आंगणे, गणेश आंगणे, आबा आंगणे, जयेश अंगणे, निशिकांत आंगणे, विलास आंगणे, प्रकाश आंगणे, भास्कर आंगणे, बाब्या आंगणे, पप्पू राणे, सुधा आंगणे, अक्षय आंगणे, चंद्रशेखर आंगणे, अमोल आंगणे, अनंत आंगणे, नितेश वंजारे, अंकुश कांबळी, तारक कांबळी, शैलेश आंगणे, पंकज आंगणे, विनोद आंगणे, बंटी अंगणे, सुयोग आंगणे, समीर आंगणे, रघुनाथ आंगणे, निशिकांत आंगणे, बाब्या आंगणे, राजू आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.