मालवण नगरपरिषदची विशेष स्वच्छता मोहीम संपन्न.
मालवण नगरपरिषदची विशेष स्वच्छता मोहीम संपन्न.
आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील मोहीमेत नगरसेविका अनिता गिरकर व मान्यवरांसह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी व काही नागरीकांचा सहभाग.
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील रेवतळे, आदर्शनगर व रेडकर हॉस्पिटल रोड या परिसरात आज दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
ही स्वच्छता मोहीम आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नगरसेविका अनिता गिरकर तसेच अन्य मान्यवर सदस्य उपस्थित होते.
या मोहिमेत आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, झाडाझुडपे व इतर अस्वच्छता दूर करून स्वच्छता केली. या उपक्रमास काही स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला अशी माहिती देण्यात आली आहे.
यापुढेही शहरातील प्रत्येक विभागात अशाच प्रकारे विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्याचे नियोजन आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती मिळत असून शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)