ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
महाशिवरात्री उत्सवानिमित्त तारकर्ली येथे विविध धार्मिक कार्यक्रम.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

महाशिवरात्री उत्सवानिमित्त तारकर्ली येथे विविध धार्मिक कार्यक्रम.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त तारकर्ली येथे विविध धार्मिक कार्यक्रम.


श्री सद्गुरू साई मंडळ, रांजेेश्वर, तारकर्ली यांचे आयोजन.


श्री. भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांची माहिती.


ब्यूरो न्यूज : श्री सद्गुरू साई मंदिर, रांजेेश्वर – तारकर्ली येथे महाशिवरात्री उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू साईंच्या कृपेने व आशीर्वादाने तसेच सर्वांच्या सहकार्याने रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ व गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रम संपन्न होत आहेत.


रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता श्री सद्गुरू सखाराम महाराज मठ येथे ग्रंथदर्शन होणार असून सायंकाळी ६.०० वाजता ‘शिवलीलामृत’ ग्रंथ पठण आयोजित करण्यात आले आहे.


गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.०० वाजता श्री साईबाबांची आरती होणार असून रात्री ८.०० वाजता भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महापुरुष महिला भजन मंडळ, वरचीवाडी – तारकर्ली तसेच नाट्य झुंजार मंडळ, तारकर्ली यांचे भजन होणार आहे. रात्री १०.०० वाजता बक्षीस वितरण समारंभ (वर्धापन दिन २०२६) संपन्न होणार आहे.


या महोत्सवात समस्त बांधव - भगिनी तसेच श्री साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मालवण तालुक्यातील 'श्री सद्गुरू साई मंडळ, रांजेेश्वर तारकर्ली,' यांच्यावतीने करण्यात आले आहे.


श्री. भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स