ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात दैनिक रत्नागिरी टाइम्स 'सिंधुदुर्ग आवृत्ती' चा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणात दैनिक रत्नागिरी टाइम्स 'सिंधुदुर्ग आवृत्ती' चा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

मालवणात दैनिक रत्नागिरी टाइम्स 'सिंधुदुर्ग आवृत्ती' चा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.


समाज प्रबोधनात दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या उल्लेखनीय योगदानाची मान्यवरांकडून प्रशंसा. 



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषद सभागृहात, 'कोकणचे सर्वाधिक खपाचे दैनिक' अशा नावलौकिकाच्या 'दैनिक रत्नागिरी टाइम्स - सिंधुदुर्ग आवृत्ती' चा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि कोकण विभाग सहआयुक्त अरविंद नातू यांची प्रमुख उपस्थिती होती.  

Article image


यावेळी नगराध्यक्षा सौ. वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, कोकण विभाग सहआयुक्त अरविंद नातू, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या हस्ते तसेच नगरसेवक व मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत दै. टाइम्सच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. 


या कार्यक्रमात, दै. टाइम्सचे मालवण तालुका प्रतिनिधी श्री. प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले. श्री. देसाई यांनी, दै. टाइम्सच्या वाटचालीची माहिती देत रत्नागिरी टाइम्सचा समाजाभिमुख उद्देश व कार्यपद्धती याविषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी प्रफुल्ल देसाई यांच्यासह मालवण वार्ताहर भूषण मेतर, पोईप वार्ताहर संजय माने यांनी उपस्थित सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले. 


यावेळी व्यासपीठावर नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अन्वेषा आचरेकर व उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक मंदार ओरसकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेविका नीना मुंबरकर, राष्ट्रीय काँग्रेसचे महेश उर्फ बाळू अंधारी, संदेश कोयंडे, संजय शिंदे, श्रीराज बादेकर व मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मनोगत व्यक्त करत दै रत्नागिरी टाइम्सला शुभेच्छा दिल्या. कोकण विभाग सहआयुक्त अरविंद नातू यांनी रत्नागिरी टाइम्स वृत्तपत्राने नेहमी विविध प्रश्नांना वाचा फोडली व समाजप्रबोधनाचे कामही केले आहे आणि येत्या काळात दै. टाइम्स आणखी मोठी उंची गाठेल अशा शुभेच्छा दिल्या. 


नगरसेविका सौ. पूनम चव्हाण, नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांनी त्यांच्या विशेष मनोगताद्वारे दै. रत्नागिरी टाइम्सच्या प्रसार सेवेची भावलेली वैशिष्ट्ये मांडत शुभेच्छा दिल्या. 


दै. रत्नागिरी टाइम्सचे मालवण तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रफुल्ल देसाई यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स