मालवणातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन उत्साहात.
मालवणातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन उत्साहात.
उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हेरिटेज टूर गाईड’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि मार्गदर्शक डॉ. योगेश पिसोळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले, तर प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून मिळणाऱ्या करिअर संधी, स्वयंरोजगाराच्या शक्यता आणि पर्यटन क्षेत्रातील वाढती मागणी याविषयी मार्गदर्शन केले. सचिव चंद्रशेखर कुशे यांनी आभार प्रदर्शन केले.
मार्गदर्शक डॉ. योगेश पिसोळकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले हुशार व गुणवंत आहेत. त्यांनी स्वतःचे हित ओळखून काही कौशल्ये विकसित केल्यास सन्मानाने उत्तम अर्थार्जन करू शकतात आणि ते करण्याची संधी आम्ही या कोर्सच्या माध्यमातून देत आहोत.
प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना डॉ योगेश पिसोळकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक व श्री. गुरूनाथ राणे
या वेळी व्यासपीठावर कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, संचालक डॉ. शशिकांत झांट्ये, डॉ. आर. एन. काटकर, प्रायोजक अंबिका कॉम्प्युटर्सचे विद्याधर केनवडेकर तसेच प्रभारी प्राचार्य कैलास राबते उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. शशिकांत झांट्ये आणि प्राचार्य कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पर्यटन क्षेत्रातील करिअर संधी, स्थानिक वारशाचे संवर्धन आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या मार्गांची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशिक्षित हेरिटेज टूर गाईड घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाला उद्घाटनाच्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी 'मालवणचा हेरिटेज वॉक.'
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.