ॲड. देवदत्त परुळेकर यांना संत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्र. श्री. नेरूरकर साहित्यिक पुरस्कार जाहीर.
ॲड. देवदत्त परुळेकर यांना संत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्र. श्री. नेरूरकर साहित्यिक पुरस्कार जाहीर.
१४ फेब्रुवारीला बांदा येथे पुरस्कार वितरण.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिवार, वाचनप्रेमी - श्रवणप्रेमी यांच्यासह विविध स्तरांतून विशेष आनंद व अभिनंदन.
ब्यूरो न्यूज : वेंगुर्ले येथील प्रसिद्ध संत साहित्यिक तथा लेखक ॲड. देवदत्त परुळेकर यांना नट वाचनालय, बांदा यांच्यावतीने देण्यात येणारा 'प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. बांदा येथे, १४ फेब्रुवारी रोजी विशेष समारंभात, नट वाचनालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ॲड. देवदत्त परुळेकर यांचे संत साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असून त्यांनी ओवी, अभंग, संतकाव्य, भक्तीपर लेखन तसेच विविध माध्यमातून साहित्यसेवेत सातत्य राखले आहे. त्यांच्या लेखनातून अध्यात्म, भक्ती व संस्कृतीचा संगम जाणवतो. विविध दैनिकांमधील लेखमालिका, साहित्यिक सदरे तसेच डिजीटल माध्यमातून सादर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे त्यांनी संत साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचले आहे
ॲड. श्री. परुळेकर हे बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच आणखीन प्रभावशाली संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून जबाबदारी निभावतात. त्यांनी अनेक व्याख्याने, प्रवचने व कीर्तने सादर केली आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत नट वाचनालयने यंदाचा पुरस्कार त्यांना जाहीर केल्याची माहिती कार्यकारी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास महायुतीचे साहित्यप्रेमी, मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही वाचनालयच्या वतीने करण्यात आले आहे.
ॲड. श्री देवदत्त परुळेकर यांच्या पुरस्काराची घोषणा झाल्यावर बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिवार, वाचनप्रेमी - श्रवणप्रेमी आणि विविध स्तरातून विशेष आनंद व्यक्त होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
मालवणात १ मे रोजी प्रचिती सौदागर यांचा 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् सादरीकरण कार्यक्रम.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.