ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
अंमली पदार्थ नियंत्रण जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अंमली पदार्थ नियंत्रण जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न.

अंमली पदार्थ नियंत्रण जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न.

Article image


अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश.


सिंधुदुर्ग नगरी | ब्यूरो न्यूज : अंमली पदार्थ अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को ऑर्डिर्नेशन समितीची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम. आय. डी. सी. परीसरात नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

Article image

यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे प्रत्यक्ष तर सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन एस. पी. यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सई धुरी, तसेच शिक्षण विभाग, उत्पादन शुल्क विभाग, बंदर विकास विभाग, समाज कल्याण विभाग, पोस्ट ऑफिस व इतर विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

Article image

     

जिल्हाधिकारी म्हणाल्या की, तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. अंमली पदार्थापासून तरूण पिढीचे रक्षण होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होण्याच्या दृष्टीने अंमली पदार्थ विरोधी पथका मार्फत विविध ठिकाणचे चेकपोस्ट व पर्यटन स्थळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. पोलिस प्रशासन आणि औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे जिल्ह्यातील एम. आय. डी. सी. परिसरात नियमित तपासणी करावी. परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची संबंधित हॉटेल चालक आणि होम स्टे धारकांनी पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही टपरी व दुकानांमध्ये अंमली पदार्थाची विक्री अथवा साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आराखडा बनवून अंमलबजावणी करावी. सिंधुदुर्ग जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व विभागाने पोलीस विभागाशी समन्वय ठेवून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन होईल याकरिता प्रयत्न करावेत व अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स