ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी एनसीसी छात्र  बाजीराव काळे यांचा सत्कार.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी एनसीसी छात्र बाजीराव काळे यांचा सत्कार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी एनसीसी छात्र बाजीराव काळे यांचा सत्कार. 

Article image


Article image

एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम. आर. खोत यांची माहिती.


मालवण | प्रतिनिधी : मालवणातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा माजी एनसीसी छात्र बाजीराव काळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाजीराव काळे हे सध्या 'अनुगामी लोकराज्य महाभियान' अंतर्गत कार्यरत असून ते अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेमार्फत सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काही वर्षे सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. 


संपूर्ण महाराष्ट्रात समाजासाठी काम करणाऱ्या २१ तरुणांचा असा सत्कार करण्यात आला असून त्यात सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणातून श्री. बाजीराव काळे यांच्यासह दोघे जण असे एकूण तीन जण अशा सत्काराचे मानकरी ठरले आहेत.


स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्यासह एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम. आर. खोत यांनी बाजीराव काळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सह सेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, संचालक ॲड. समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झांटये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, पदाधिकारी, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, तहसीलदार गणेश लव्हे यांनीअभिनंदन केले असून '58 महाराष्ट्र बटालियन' कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर तामिळनाडू, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर, सुभेदार यांनीही बाजीराव काळे यांची विशेष प्रशंसा व अभिनंदन केले असल्याची माहिती एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम. आर. खोत यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स