सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्डच्या वतीने आंगणेवाडीत बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ.
आंगणेवाडीत 'सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड' च्या वतीने बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ.
जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व्हिक्टर डांटस, नाबार्ड जिल्हा प्रबंधक श्रीम. दिपाली माळी, अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी माता वार्षिकोत्सव २०२६ च्या निमित्ताने, सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथे बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट चळवळ कार्यरत आहे. जिल्हा बँक व नाबार्ड च्या माध्यमातून मागील दहा ते बारा वर्षांपासून या बचत गटांना उभारी देण्याचे काम सुरु आहे. सध्या जिल्ह्यात १५ हजार पेक्षा जास्त महिला बचत गट अस्तित्वात असून सुमारे ८० कोटी रुपये रक्कम या बचत गटांच्या खात्यात आहे. भविष्यातलं राजकारण महिला बचत गटांचं असणार असून उद्या गावचा लोकप्रतिनिधी कोण असावा, हे महिला बचत गट ठरवणार आहेत. आंगणे वाडी सारख्या जत्रेत ७०% नफा जिल्ह्याबाहेरील व्यापारी घेऊन जातात, अशावेळी जिल्हा बँकेमार्फत उभारलेल्या स्टॉल मधून मागील वर्षी ५० ते ६० लाखांचे उत्पन्न या महिला बचत गटांनी मिळवले. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकटीकरणात या महिला बचत गटांचाही खारीचा वाटा आहे, असेही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे संचालक व्हीक्टर डांटस, जिल्हा प्रबंधक नाबार्ड श्रीम. दिपाली माळी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बाळ परब, नितीन काळे जिल्हा समन्वयक अधिकारी (मावीम), वैभव पवार व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, मालवणच्या नगरसेविका शर्वरी पाटकर, स्विकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, संदीप गावडे यांच्यासह जिल्हा बँक अधिकारी, शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. श्री. प्रमोद गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रदर्शनात ११० बचत गट सहभागी झाले असून त्यात जिल्ह्याबाहेरील ४ बचत गटांचा समावेश आहे अशी त्यांनी माहिती दिली. या बचत गटाच्या उत्पादीत मालाची विक्री १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू रहाणार आहे.
यावेळी जिल्हा बॅन्क संचालक व्हिक्टर डांटस म्हणाले की, जिल्हा बँके मार्फत अनेक उपक्रम राबवले जात असल्याचे सांगून त्यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे महिला बचत गट सक्षमीकरण आहे. महिला बचत गट उत्पादन करतात. पण त्यांना विक्रीसाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यासाठी जिल्हा बँक व नाबार्ड त्यांना मोठ्या शहरात विक्री व्यवस्था देत असल्याचे सांगून भविष्यात मुंबई, दिल्ली यासारख्या ठिकाणी देखील ही व्यवस्था दिली जाईल.
नाबार्डच्या अधिकारी दीपाली माळी यांनी नाबार्डच्या महिला बचत गटांसाठीच्या उपक्रमांची माहिती दिली. श्री. शरद सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
आचरा येथे शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर.
आचरा येथे शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण श...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.