ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
आम्हाला १५ ऑगस्ट आणि बाकिच्यांना ३० जुलै....?
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आम्हाला १५ ऑगस्ट आणि बाकिच्यांना ३० जुलै....?

आम्हाला १५ ऑगस्ट आणि बाकिच्यांना ३० जुलै....?

Article image


तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे मासेमारी बंदीच्या मुदतीबद्दल शासनाला विविध सवाल.


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख तसेच अनुभवी मच्छिमार आणि मच्छिमार नेते हरी खोबरेकर यांनी मासेमारी बंदीच्या मुदतीबाबत शासनाला विविध मुद्द्यांद्वारे सवाल केले आहेत.


महाराष्ट्र राज्यात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी शेजारील राज्यांमध्ये ही बंदी ३० जुलैला संपत आहे. बंदिच्या वाढीव कालावधीत शेजारच्या राज्यांतील ट्रॉलर्सधारक महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून मासळीची लूट करण्याची शक्यता आहे असे हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, परराज्यातील ट्रॉलर्सना रोखण्यासाठी आणि मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी 'शासन पायबंद घालणार' असा सवाल तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे.


काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंतच होता. मात्र, शेजारील राज्यांशी सुसंगतता राखण्यासाठी आणि स्थानिक मच्छिमारांचे नुकसान टाळण्यासाठी हा कालावधी नंतर ३० जुलैपर्यंत करण्यात आला होता. आता शासनाने पुन्हा नव्याने हा बंदी कालावधी वाढवून तो १५ ऑगस्ट केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मच्छिमारांच्या नौका बंदरावर उभ्या राहतील, पण दुसरीकडे लगतच्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमधील मासेमारी बंदी ३० जुलैलाच संपणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासूनच या राज्यांतील शेकडो ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासळीची लूट करण्यासाठी सज्ज होतील, अशी भीती खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे.


जर महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी आणि येथील हक्काची मासळी लगतच्या अन्य राज्यांतील ट्रॉलर्सना एकप्रकारे आंदणच दिली जाणार असेल, तर 'या निर्णयाचा फायदा काय,' असा हरी खोबरेकर यांचा सवाल असून, आपल्या राज्यातील मच्छिमारांचे हित राखण्यासाठी, लगतच्या राज्यांमध्येही मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री 'केंद्रीय पातळीवर किंवा संबंधित राज्यांशी,' चर्चा करून प्रयत्न करणार आहेत का असा प्रश्न देखिल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.


वाढीव १५ दिवसांच्या काळात परराज्यातील यांत्रिक नौका आणि हायस्पीड ट्रॉलर्सना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी 'मत्स्यव्यवसाय विभाग आणि सागरी पोलीस काय कडक पावले उचलणार', याकडे आता संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमारांचे लक्ष लागले आहे. शासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना जाहीर करावी, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स