'उभ्या जन्मात माऊली....'
'उभ्या जन्मात माऊली...'
श्री. भराडी माता वार्षिकोत्सव २०२६ पूर्वारंभ विशेष.
वार्षिकोत्सव परिसराचा विशेष 'बर्ड व्ह्यू..!'
मसुरे | प्रतिनिधी ( विशेष ) : तुझ्या दर्शनाची आस, कधी थांबायची नाही....
उभ्या जन्मात माऊली, वारी चुकायची नाही.....!'
कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतूर झाले आहेत. वस्त्रालंकारानी सजलेले देवीचे रुप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने भाविकांचा महापुर उद्या सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडीत उसळणार आहे. नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रुप असलेल्या भराडी मातेच्या दर्शना साठी मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेली तयारी आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यानी आंगणेवाडी व परिसर गजबजुन गेला आहे. यात्रेत आठ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
देवी भराडीचा महिमा जिल्ह्या पुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यामुळे आंगणेवाडीच्या यात्रेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. यात्रोत्सवाच्या निमीत्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात येणार आहे. यात्रे दिवशी मातेचे तेजोमय रुप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभाऱ्या मध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी महनीय व्यक्तींच्या दर्शन रांगेत थोडासा बदल करण्यात आला आहे. सभामंडप व गाभाऱ्याचे रुप रेशमी कापडी पडदे, विविध फुलांच्या सजावटीने अवर्णनिय असेच भासणार आहे.
सोमवारी पहाटे प्रथेप्रमाणे धार्मिक विधी झाल्या नंतर जत्रोत्सवास भाविकांच्या ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजता प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. भाविकाना मौज घडवून आणण्यासाठी आकाश पाळणा, 'मृत्युगोल' वगैरे मनोरंजनाची खेळणी सज्ज झाली आहेत. मालवण, मसुरे व कणकवली स्टँड नजिक पार्कींग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विज वितरण कंपनीने सुध्दा अखंडीत विज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे.
अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्य. अभि. सौरभ माळी, उप कार्य. अभियंता राहुल लिमकर, शाखा अभि. प्रमोद मार्बते, मुख्य तंत्रज्ञ रमेश राठोड, चार शाखा अभियंता, ४० वायरमन अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी कार्यरत असणार आहेत.एसटीच्या वतीने १३५ यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
मंदिरामध्ये १२ व जत्रा परिसरात ३६ ठिकाणी असे ४८ क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्या द्वारे यात्रेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे अशी माहिती अनंत आंगणे यांनी दिली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. कर्डीयक व्हॅन व १०८ रुग्णवाहीका तैनात असणार आहेत. विज वितरण कंंपनी कडुन हंगामी व्यापाऱ्याना तात्पुरती विज कनेक्शन देणे चालू आहे. कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून बंदोबस्त राहणार आहे. तसेच टेहळणी टॉवर, साध्या वेशातील महिला व पुरुष कर्मचारी यात्रेवर लक्ष ठेवून असणार आहेत. महनीय व्यक्ती साठी मुख्य स्वागत कक्षा लगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे.
देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी नऊ रांगांमधुन व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सोमवारी रात्री ९ ते १२ या वेळेत धार्मिक विधीसाठी भाविकांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकानी संयम व शिस्त बाळगुन देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, बाबू आंगणे यानी केले आहे.
सौजन्य | मसुरे प्रतिनिधी
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...
आपापल्या 'कालिंदीं'साठीच्या प्रदूषणरूपी कालियाच्या पाच फण्यांची ओळख ....!
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.