आचरा येथे शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर.
आचरा येथे शेळीपालन व कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर.
श्री. समीर लब्दे यांचे विशेष आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण यांच्यामार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरे विभाग आणि शेतकरी विकास मंच आचरे पंचक्रोशी यांच्या वतीने शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण मंगळवार, २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत लौकिक सांस्कृतिक भवन आचरा वरची वाडी येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री. समीर लब्दे यांनी दिली आहे
चार दिवस चालणाऱ्या शेळीपालन प्रशिक्षण शिबिरात कोकणात पाळण्यात उपयुक्त शेळ्यांच्या जाती व उत्पादकता, शेळ्यांचे आजार, उपचार व लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन, शेळ्यांसाठी घर बांधणी व शेळी घरासाठी जागेची निवड, शेळीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च, शेळ्यांसाठी चारा व वृक्ष लागवड यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिरात परसबागेत पाळण्यात उपयुक्त कोंबड्याच्या जाती व उत्पादकता, कोंबड्यांचे आजार, उपचार व लसीकरण प्रात्यक्षिकांसह, खाद्य व पाणी व्यवस्थापन, कोंबडी घर बांधणी व कोंबडी घरासाठी जागेची निवड, पोल्ट्रीफार्म व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, जमाखर्च याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दोन्ही प्रशिक्षणात प्रत्येकी २५ प्रशिक्षणार्थिंना सहभाग देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत जेवण, चहा-नाष्टा यांची सोय केली जाणार असून सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभाग घेण्यासाठी श्री. समीर लब्दे 8208026221/9423211672) यांच्याकडे नावनोंदणी करावी अशी माहिती मिळत आहे.
या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री. समीर लब्दे यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
चिंदर येथे २० फेब्रुवारीला मोफत नेत्र तपासणी...
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर य...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
मालवण भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिर.
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.