ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
कट्टा येथे हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिक सभा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथे हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिक सभा संपन्न.

कट्टा येथे हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिक सभा संपन्न.       



Article image




मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिक सभा कट्टा येथे प्रभाग संघ अध्यक्ष मीनल पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य श्री. गावडे, तालुका अभियान व्यवस्थापक रविकिरण कांबळे, तालुका व्यवस्थापक साळवे, प्रभाग समन्वयक विरेश पवार, तालुका ब्लॉक अँकर सचिन किर्लोस्कर, प्रभाग सचिव सौ. सीता मेस्त्री उपस्थित होते.

  

उमेद अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना, विशेषतः महिलांना स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून संघटित करून शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे, आर्थिक आणि सामाजिक समावेशक साधणे आणि त्यांना गरिबीतून बाहेर काढणे हा आहे. प्रभाग संघ ही या संस्थीय रचनेतील महत्त्वाची कडी आहे. आपला प्रभाग संघ मॉडेल संघ होण्यासाठी उद्योग करा, प्रभागाचा जिल्ह्यात नावलौकिक होवो, असे आवाहन सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी यावेळी केले. यावेळी जि. प. सदस्या सुमेधा पाताडे यांनी प्रत्येक ग्राम संघांना कार्यालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. 


या सभेला ५९० महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक सीता मेस्त्री, अहवाल वाचन प्राजक्ता नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया पांडुरंग आंगणे यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स