मालवणात १११ मतदान केंद्रावर होणार मतदान.
मालवणात १११ मतदान केंद्रावर होणार मतदान.
सखी मतदान केंद्राव मतदान केंद्र अध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांसह मतदान अधिकारी अनुष्का कदम, मतदान अधिकारी राधा दिघे, मतदान अधिकारी शुभांगी लोकरे तसेच कर्मचारी सिमाली परब यांची नियुक्ती ; सखी केंद्र झोनल अधिकारी म्हणून श्वेता यादव पहाणार काम.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद व ११ पंचायत समिती जागांसाठी १११ मतदान केंद्रांवर, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात बारा झोनल अधिकाऱ्यांसह ४४४ अधिकाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावरील मतदान यंत्रे मतदान केंद्र अध्यक्ष व अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती मिळत आहे.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी मालवण तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे रवाना करण्यात आली आहेत.
सखी मतदान केंद्र
मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबंदा हे 'सखी मतदान केंद्र' असणार आहे. याठिकाणी मतदान केंद्र अध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांसह मतदान अधिकारी अनुष्का कदम, मतदान अधिकारी राधा दिघे, मतदान अधिकारी शुभांगी लोकरे तसेच कर्मचारी सिमाली परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सखी केंद्र झोनल अधिकारी म्हणून श्वेता यादव काम पाहणार आहेत. यासोबत मालवण तालुक्यातील गोळवण जिप शाळा नं. २ हे आदर्श मतदान केंद्र असणार आहे.
मालवण तालुक्यात ३६, ६२६ पुरुष मतदार तर ३८, १०३ स्त्री मतदार असे एकूण ७४, ७२९ मतदार आहेत.
शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७. ३० ते सायंकाळी ५. ३० हा मतदानाचा कालावधी असणार आहे आणि सोमवारी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मतमोजणी होणार आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...