वायरी भूतनाथ मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार उत्साहात.
वायरी भूतनाथ मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार उत्साहात.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील, वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार घनश्याम झाड तसेच जिल्हापरिषद मतदार संघाच्या शिवसेना महायुतीच्या उमेदवार अक्षता गावडे यांचा, देवबाग गावात प्रचार करण्यात आला. महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, दाजी सावजी, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, हरी खवणेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होते.
भाजपा नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनातं महायुतीच्या माध्यमातून घरोघर प्रचार केला जात आहे. महायुती सरकारच्या जनहिताच्या योजना, केलेल्या विकास कामांच्या जोरावर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातून अक्षता गावडे, आणि पंचायत समिती उमेदवार घनश्याम झाड मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...