'उडान' महोत्सवात मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयाचे भरीव यश...!
'उडान' महोत्सवात मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयाचे भरीव यश...!
डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे आयोजित महोत्सव.
महेक शेख़ लिखीत व दिग्दर्शित पथनाट्याला सुवर्णपदक आणि पोवाड्याला रौप्यपदक...!
मालवण | सानिका वायंगणकर :
डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे मुंबई विद्यापीठ यांच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे आयोजित उडान महोत्सव २०२५ - २०२६ मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.
पथनाट्य स्पर्धेत, मेहेक शेख़ लिखीत व दिग्दर्शित ‘इ - कचरा’ या विषयावर सादर केलेल्या पथ नाट्याला सुवर्णपदक मिळाले. या सादरीकरणात सौरभ चव्हाण ( तृतीय वर्ष, वाणिज्य), रामचंद्र बिलये (तृतीय वर्ष, वाणिज्य), रोहन गावडे (तृतीय वर्ष, विज्ञान)), प्रेरणा शेलटकर (तृतीय वर्ष, वाणिज्य), नमिता पारकर (तृतीय वर्ष, वाणिज्य), भार्वी शिरसेकर (तृतीय वर्ष, वाणिज्य), गौरी रेवंडकर (तृतीय वर्ष, वाणिज्य), स्नेहा सनये ( तृतीय वर्ष, वाणिज्य), सुनीता चव्हाण (तृतीय वर्ष, वाणिज्य), हेमा केरकर (तृतीय वर्ष, वाणिज्य) यांनी भूमिका साकारल्या. प्रथम येसाजी आणि निखिल पेडणेकर (तृतीय वर्ष, वाणिज्य) यांनी संगीत साथ दिली.
पोवाडा सादरीकरण स्पर्धेत मेहेक शेख़ लिखीत व दिग्दर्शित, ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर सादर केलेल्या पोवाड्याला रौप्यपदक प्राप्त झाले. या गटात सौरभ चव्हाण, प्रेरणा शेलटकर, समीक्षा तावडे, दीक्षा सावंत, हेमा केरकर, नमिता पारकर, आकांक्षा परब, गौरी रेवंडकर तसेच संगीत साथ करणारे प्रथम येसाजी व निखिल पेडणेकर (सर्व - तृतीय वर्ष वाणिज्य) सहभागी होते.
वक्तृत्व स्पर्धेत ‘Environment Conservation’ या विषयावर भाषण सादर करणाऱ्या मेगल डिसोझा (तृतीय वर्ष विज्ञान) हिने रौप्यपदक तसेच सृजनशील लेखन स्पर्धेत ‘Social Media Addiction’ या विषयावर लेख सादर करून कांस्यपदक मिळवले.
यशस्वी सहभागींना, 'आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या विस्तार कार्य शिक्षिका' प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या विभागाचे विद्यार्थी व्यवस्थापक सौरभ चव्हाण आणि प्रेरणा शेलटकर यांनी नियोजन, सराव आणि सादरीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योगदान दिले.
महेक शेख़ ( सुवर्णपदक प्राप्त नाटिका व रौप्यपदक प्राप्त पोवाडा लेखक - दिग्दर्शक | माजी विद्यार्थीनी, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण.)
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. कुणाल जाधव (मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते चषक, पदके व प्रशस्तीपत्रके प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रा. डाॅ. सुमेधा नाईक व प्रा. रामचंद्र तावडे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना स्पर्धेसाठी घडवण्यासाठी योगदान दिलेल्यांचे, महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळचे अध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष समीर गवाणकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ;...