मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' प्रदान.
मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' प्रदान.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा व्यापारी एकता मेळावा देवगड येथे ३१ जानेवारी रोजी संपन्न झाला. या मेळाव्यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारातील 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना प्रदान करण्यात आला. देवगड येथे झालेल्या जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. श्री. नेरूरकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व ॲप्लॉईड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे चेअरमन रामभाऊ भोगले, आय - ४१ इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक महेश चव्हाण, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, उपाध्यक्ष संजय भोगटे, सागर शिरसाट, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला तालुकाध्यक्षा प्रियांका साळसकर, स्वागताध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सचिव संजय मेस्त्री, देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे तसेच इतर तालुक्यातील व्यापारी संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
विजयदुर्ग बंदर विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या अध्यक्षांना निवेदन.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट ...
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
पळसंब येथे भव्य रानभाजी महोत्सवाचे आयोजन.शेत...
भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.