ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवणमध्ये 'गांधी जागर २०२६' उत्साहात संपन्न.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवणमध्ये 'गांधी जागर २०२६' उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 02 Feb 2026 12:50 PM
वाचन संख्या 312

मालवणमध्ये 'गांधी जागर २०२६' उत्साहात संपन्न. 

Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने आयोजित, 'गांधी जागर २०२६' कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी झाले. यंदा 'गांधी जागर' चे तिसरे वर्ष होते. गांधी जागरच्या पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी, खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांचे स्वागत व त्यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष ॲड. देवदत परुळेकर, सौ. मंगल परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कार्योपाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, संचालक विकास म्हाडगुत, सौ. वीणा म्हाडगुत यांच्यासह वक्ते मानसोपचार तज्ञ डाॅ. रुपेश पाटकर, सुनिती सु. र., संपत देसाई, प्रकाश पवार, सचिन परब, प्रा. सुभाष वारे, प्रा. आनंद मेणसे, सिरत सातपुते, इब्राहिम खान व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर आणि मान्यवर उपस्थित होते. सर्व वक्त्यांचे ग्रंथभेट देत स्वागत करण्यात आले. बॅरिस्टर नाथ पै यांचे सहकारी साथी किशोर पवार यांच्या कन्या मंगलप्रभा पवार यांचे देखिल यावेळी ग्रंथभेट देत स्वागत करण्यात आले. तसेच संपत देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त सेवांगणच्या वतीने पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यात आल्या. 

Article image


गांधी जागरचे पहिले सत्र सुरू होण्यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासह विमान अपघातात कालवश झालेल्या व्यक्तींचे तसेच मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने उपस्थितांसह श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


पहिला दिवस

३१ जानेवारी रोजी सकाळी पहिल्या सत्रात, वक्ते तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील गांधी अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी 'गांधी आणि जातीव्यवस्था' विषयावर भाषण केले. बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते व मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी 'गांधी विचार आणि मी' या विषयावर विचार व अनुभवांद्वारे मनोगत व्यक्त केले. दुपारच्या सत्रात सद्भावना मंचच्या सुनिती सु. र. (पुणे), संपत देसाई (आजरा), सिरत सातपुते (मुंबई) इब्राहिम खान (पुणे) यांनी 'गांधी आणि सामाजिक सद्भावना' विषयावर मार्गदर्शन केले.


दुसरा दिवस

१ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात, 'रिंगण' या संत वैचारिक वार्षिकांकाचे संपादक श्री. सचिन परब यांनी 'गांधीजींना भावलेले तुकोबा' या विषयावर मौलिक भाषण केले. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त, एस. एम. जोशी फाउंडेशन विश्वस्त व समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक नेते प्रा. सुभाष वारे यांनी जयप्रकाश नारायण, राम नारायण लोहिया, नरेंद्र देव, साने गुरुजी, बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते या सर्व समाजवादी नेतृत्वांवर गांधीजींचा कसा प्रभाव होता याबद्दल 'गांधीजी व समाजवाद' यांचे नाते 'गांधीजी आणि समाजवाद' विषयाद्वारे मांडले. दुपारच्या सत्रात बेळगावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वक्ते श्री. आनंद मेणसे यांनी वर्तमान काळातील प्रश्नांना भिडताना गांधी व आंबेडकर काय मार्गदर्शन करतात हे जाणून घेण्यासाठी 'समकालीन वर्तमान आणि गांधी आंबेडकर विचार' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी प्रश्न विचारत चर्चासत्रात सहभाग घेतला. 

Article image

यावेळी जिल्हा परिषद आडाळी प्रशालेच्या विद्यार्थिनींसह शिक्षिका सौ. केसरकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण प्रांगणात चरख्याद्वारे सूत कातण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


Article image

तसेच महात्मा गांधी सेल्फी व छायाचित्र पाॅईंट आणि महात्मा गांधी यांचे थोडक्यात वर्णन करणारे शब्द असलेले सद्भावना झाड विशेष आकर्षण ठरत होते.


महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकांच्या प्रदर्शनाला देखिल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . 


या कार्यक्रमात, सहभागी श्रोत्यांमध्ये बॅरिस्टर नाथ पै महाविद्यालय, लांजा रत्नागिरी इथल्या १२ विद्यार्थी विद्यार्थीनींची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्यासह गोवा आणि विविध राज्यातील मान्यवरांनी उपस्थित राहून गांधी जागरच्या कार्यक्रमाविषयी विशेष समाधान व्यक्त केले व अशाप्रकारचे कार्यक्रम वारंवार व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आणि भारतीय म्हणून 'गांधी' तत्वाची वैयक्तिक व सामाजिक गरज मनोगतांमधून स्पष्ट केली.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष ॲड देवदत परुळेकर यांच्या मार्गदर्शनासह कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर यांच्यासह वैष्णवी आचरेकर, सोनाली कोळंबकर तेजस्विनी पाताडे, शितल कदम, स्मिता साटम, रुचिरा चिंदरकर, भालचंद्र मळेकर, धर्माजी कांबळी, रविंद्र बागवे, सचिन वरक, स्वप्नील साटम तसेच साने गुरुजी वाचन मंदिरच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर व सहाय्यक गौरी केळुसकर यांनी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे भेटवस्तू देत कौतुक करण्यात आले. कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.


Article image

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती तोरसकर यांनी केले आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स