ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
विजयदुर्ग बंदर विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या अध्यक्षांना निवेदन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

विजयदुर्ग बंदर विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या अध्यक्षांना निवेदन.

विजयदुर्ग बंदर विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या अध्यक्षांना निवेदन.

Article image


गव्हर्निंग कौन्सिल मेंबर भालचंद्र राऊत, अशोक सारंग, नंदन वेंगुर्लेकर आणि चेंबरचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित.


​मुंबई | ब्यूरो न्यूज : कोकणच्या अर्थकारणाला आणि विकासाला नवी गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदराच्या विकासासंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर (MACCIA) चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर रवळनाथ पुनाळेकर यांनी चेंबरचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र माणगावे यांना नुकतेच एक निवेदन सादर केले आहे अशी माहिती मिळत आहे.


​या निवेदनात, विजयदुर्ग बंदराचा विकास झाल्यास संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन, मासेमारी, आंबा बागायती व्यवसाय आणि आयात - निर्यात व्यवसायाला मोठी चालना मिळू शकते असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, विजयदुर्गच्या विकासासोबतच मालवण, आचरा, सर्जेकोट, खवणे, निवती यांसारख्या इतर बंदरांच्या विकासालाही गती मिळेल असे निवेदनात नमूद केले आहे असे समजते आहे.


​यावेळी ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, ​सिद्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, ​गव्हर्निंग कौन्सिल मेंबर भालचंद्र राऊत, शिवाजी राव घोगळे, अशोक सारंग, ​नंदन वेंगुर्लेकर आणि लायन्स क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष आनंद कर्पे आणि अनेक चेंबरचे ज्येष्ठ पदाधिकारी व महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते.


 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स