'गांधी जागर २०२६' कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर.
'गांधी जागर २०२६' कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. श्री. देवदत्त परुळेकर यांचे सर्वांना उपस्थितीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित 'गांधी जागर २०२६' कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर झाली आहे.
गांधी जागरच्या पहिल्या दिवशी, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी, सकाळी साडेदहा वाजता वक्ते तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील गांधी अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार 'गांधी आणि जातीव्यवस्था' विषयावर भाषण करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता, बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते व मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर 'गांधी विचार आणि मी' या विषयावर विचार व अनुभवांद्वारे मनोगत व्यक्त करणार आहेत.
दुपारी ३ वाजता सद्भावना मंच सुनिती सु. र. (पुणे), संपत देसाई (आजरा), सिरत सातपुते (मुंबई) इब्राहिम खान (पुणे) व सहकारी "गांधी आणि सामाजिक सद्भावना' विषयावर मार्गदर्शन व चर्चा करणार आहेत.
गांधी जागरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजता
'रिंगण' या संत वैचारिक वार्षिकाचे संपादक श्री. सचिन परब हे 'गांधीजींना भावलेले तुकोबा' विषयावर भाषणाद्वारे माहिती देणार आहेत.
दुपारी १२ वाजता, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त, एस. एम. जोशी फाउंडेशन विश्वस्त व समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक नेते सुभाष वारे, अहमदनगर हे जयप्रकाश नारायण, राम नारायण लोहिया, नरेंद्र देव, साने गुरुजी, बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते या सर्व समाजवादी नेतृत्वांवर गांधीजींचा कसा प्रभाव होता याबद्दल 'गांधीजी व समाजवाद' यांचे नाते'गांधीजी आणि समाजवाद' विषयाद्वारे मांडणार आहेत.
दुपारी बेळगावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वक्ते श्री. आनंद मेणसे हे, वर्तमान काळातील प्रश्नांना भिडताना गांधी व आंबेडकर काय मार्गदर्शन करतात हे जाणून घेण्यासाठी 'समकालीन वर्तमान आणि गांधी आंबेडकर विचार' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
'गांधी जागर २०२६' हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून चहा, नाष्टा, भोजन यांची व्यवस्था सेवांगण संस्थेमार्फत केली जाणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने आयोजित 'गांधी जागर' उपक्रमाच्या यंदाच्या तिसऱ्या वर्षाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे आणि या वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने अध्यक्ष ॲड. श्री. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे अशी माहिती बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खांडाळेकर, कार्यकारी मंडळ तसेच व्यवस्थापक संजय आचरेकर आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.