ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य दुखवटा पाळण्याचे निर्देश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य दुखवटा पाळण्याचे निर्देश.

प्रकाशन: 28 Jan 2026 02:30 PM
वाचन संख्या 80

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य दुखवटा पाळण्याचे निर्देश. 


सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित अनंतराव पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्य दुखवटा पाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 


दिनांक २८ जानेवारी ते ३० जानेवारी (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा राज्य दुखवटा पाळण्यात येईल. या कालावधीत ज्या सर्व शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात यावा. राज्यशोक कालावधीत कोणताही अधिकृत / शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे घोषित करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सर्व संबंधित विभागप्रमुख / कार्यालयप्रमुख यांनी करावी, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स