ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार लुडबे नियुक्त.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार लुडबे नियुक्त.

प्रकाशन: 27 Jan 2026 03:56 PM
वाचन संख्या 300

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदी मंदार लुडबे नियुक्त. 

Article image

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र. 


मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा अभिनंदपर सत्कार केला.


यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत, राजा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे, छोटू ठाकूर, संदीप भोजने, उमेश बिरमोळे, महेश लुडबे, सूरज बिरमोळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.


युवा स्तरावर, तालुका तसेच जिल्हा स्तरावर आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जबाबदारी पेललेल्या मंदार लुडबे यांच्यातील उपजत तसेच गेल्या काही निवडणुकांच्या माध्यमातून विकसीत झालेला 'स्थीर आणि खंबीर रचनात्मक राजकीय दृष्टीकोन' त्यांना नूतन जबाबदारीसाठी उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया विशेष राजकीय तज्ञांमधून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स