सावंतवाडीत रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर संपन्न.
सावंतवाडीत रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर संपन्न.
राष्ट्र सेवा पुरस्कारप्राप्त योगशिक्षक तथा शिबीराचे उद्घाटक शेखर बांदेकर यांचे मार्गदर्शन.
ब्यूरो न्यूज | सावंतवाडी : रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग व घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आज (दि. २५ जानेवारी २०२६) १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर संपन्न झाले.
या शिबिरात नियोजित वेळेत पाच मिनिटांत सर्वाधिक सूर्यनमस्कार पूर्ण करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम – गौरी धैर्यशील शिर्के (५ मिनिटांत ४० सूर्यनमस्कार), द्वितीय – दुर्गा साईश वाडकर (३९), तृतीय – निशिगंधा नारायण सावंत (३४) व विशाल विजय लातये (३४), तर उत्तेजनार्थ – महादेव बाळकृष्ण तेली (३३) यांनी यश संपादन केले. 'घे भरारी फाउंडेशन' च्या वतीने सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र, सुवर्ण - रौप्य - कांस्य पदके, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
जास्तीत जास्त सूर्यनमस्कार पूर्ण केल्याबद्दल सारिका पुनाळेकर, सीमा रेडीज आणि सलोनी वंजारी यांचाही प्रशस्तीपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला. विशेष आकर्षण ठरले ते ७२ वर्षांच्या जयश्री गणपत घडशी आणि ६७ वर्षांच्या मृणाल महादेव सावंत यांनी तब्बल १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करून उपस्थितांची दाद मिळवली; त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांनी सूर्यनमस्काराचे शास्त्रीय व आरोग्यदायी महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. पी. डी. स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. संप्रवी कशाळीकर, तर उद्घाटक म्हणून राष्ट्र सेवा पुरस्कारप्राप्त योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर उपस्थित होते.
यावेळी 'घे भरारी फाउंडेशन'च्या संस्थापिका सौ. मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, उपाध्यक्षा संध्या पवार, सेक्रेटरी सलोनी वंजारी, सल्लागार शारदा गुरव, तसेच मेघा भोगटे, गीता लोहार, सीमा रेडीज, सारिका पुनाळेकर, वर्षा गावकर, रविंद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
१०८ सूर्यनमस्कारांचे शिबीर श्री. शेखर बांदेकर यांनी संचलित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ, तर आभारप्रदर्शन श्री. विशाल लातये यांनी केले. या शिबिरात फिटनेस योग अकॅडमीचे विद्यार्थी, हिरकणी, महालक्ष्मी व वटसावित्री योगवर्गातील साधक तसेच सावंतवाडी शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला. एकूण ९० योगसाधक या उपक्रमात सहभागी झाले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
सिंधु रनर्सचा बालक कबीर हेरेकर ठरतोय प्रशंसनीय धावक ; बालदिन विशेष.
सिंधु रनर्सचा बालक कबीर हेरेकर ठरतोय प्रशंसन...
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ.
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्...
सावंतवाडीत रक्तदात्यांचा सन्मान.
सावंतवाडीत रक्तदात्यांचा सन्मान.सावंतवाडी | ...
योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान.
योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.