ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ.

सिंधू रनर्सच्या 'सावंतवाडी १२ तास रन'चा ८ ऑगस्टला शुभारंभ. 


दक्षिण आफ्रिकेतील 'काॅम्रेड मॅरेथॉन फेम' व "सिंधु रनर' ओंकार पराडकर यांची विशेष माहिती.

Article image


ब्यूरो न्यूज | सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद व सिंधू रनर्स, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता ते ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत मोती तलाव परिसरात घेण्यात येणार असून या स्पर्धेचा शुभारंभ ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता राजवाडा प्रवेश‌द्वार येथून होणार आहे. या स्पर्धेत ३ तास, ६ तास आणि १२ तास अशा तीन गटांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह, गोवा व इतर राज्यांतील धावपटू सहभागी होणार आहेत.


दक्षिण आफ्रिकेतील 'काॅम्रेड मॅरेथॉन फेम' व "सिंधु रनर' ओंकार पराडकर यांनी याबाबत मिळत असलेल्या प्रतिसादाची विशेष माहिती दिली आहे.


सिंधू रनर्स यांच्या वतीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रात्रभर धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन द्यावे आणि या क्रीडा सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद आणि सिंधु रनर्स, सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ओंकार पराडकर (9420307187) व भूषण बांदेकर (9527387727) यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स