सिंधु रनर्सचा बालक कबीर हेरेकर ठरतोय प्रशंसनीय धावक ; बालदिन विशेष.
संपादकीय : 'सिंधु रनर्स' ही, दीर्घ धावण्यातून आरोग्य तसेच मानवी प्रगतीची लांब पल्ल्याची मजल असे विविध प्रतिकात्मक संदेश देणारी एक 'धावसंस्था' आहे. यातील ओंकार पराडकर, डाॅ. स्नेहल गोवेकर, प्रसाद कोरगावकर अशी अनेक तळमळीच्या मार्गदर्शक 'धावकांची नावं' आता सर्व स्तरात सुपरिचित होत जात आहेत. यापैकी ओंकार पराडकर व प्रसाद कोरगावकर ही नावं, दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय काॅम्रेड मॅरॅथॉन मध्ये पदकप्राप्तीच्या यादीतही नोंदली गेली आहेत.
गेली दोन वर्षे सिंधू रनर्सच्या धावक नावांच्या यादीत कु. कबीर हेरेकर हे नांव देखिल सातत्याने समोर आलेलं आहे. कु. कबीर हा ओंकार पराडकर व प्रसाद कोरगावकर अशा धावक ॲथलीटपेक्षा वयाने तिप्पट लहान आहे. तो बालक आहे परंतु सातत्याने मोठ्यांच्या स्पर्धांमध्ये त्याची समांतर अशी धावपट्टी धावत आहे. नुकताच कु. कबीर हेरेकर याचा बेळगाव येथे विशेष सत्कार संपन्न झाला.
कु. कबीर नबीला नविद हेरेकर हा सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. नुकतीच, त्याने कर्नाटक येथे बेळगाव हिली रन व गोवा पोंडा येथे संपन्न झालेल्या डॉ. रमाणी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत ह्या दोन्ही स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी बजावली. त्याने वयाच्या १० व्या वर्षी ५ किलोमीटर ते २५ किलोमीटर च्या ४५ मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. त्याच्या अशा कामगिरी बद्दल काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब व आरोग्य मित्र तर्फे आयोजित केलेल्या हेल्थ अँड फिटनेस एक्स्पो मध्ये 'हॉल ऑफ फेम' म्हणून गौरवण्यात आले असे समजते.
कु. कबीर हेरेकरच्या विविध सहभागांमध्ये त्याच्या सोबत त्यांचे वडिल नविद हेरेकर व आई नबिला हेरेकर हे कबीरच्या सर्वांगीण क्षमतांच्या वर्धनासाठी, त्यांचा यथाशक्ती 'वेळ आणि उपस्थिती' याचे व्यवस्थापन करत असतात. बालकामधील भविष्याला प्रोत्साहन देताना त्याच्या हक्काचा वर्तमान कटाक्षाने जपत असतात.
'सिंधू रनर्स' चे संस्थापक सदस्य ओंकार पराडकर, डाॅ. स्नेहल गोवेकर, प्रसाद कोरगावकर आणि इतर सर्व मान्यवर सदस्य मंडळींनी, त्यांच्या जीवनाच्या 'मध्यम वयात' सिंधू रनर्सची ज्योत प्रज्वलीत केली आणि त्यांना सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री लखमराजे भोसले यांनी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य केले. प्रशिक्षक जाॅन्सन फर्नांडिस हे धावकांसाठी नियमीत मेहनत घेत आहेत. सिंधु रनर्सच्या कु. कबीर हेरेकर सारखी धावक बालके त्याच जाणीव ज्योतीच्या प्रकाशात धावताना बघताना संपूर्ण 'सिंधू रनर्स' समूहाला आत्यंतिक 'धाव आनंद' होत असून कु कबीर हेरेकरवर प्रशंसेचा वर्षाव होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
सावंतवाडीत रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर संपन्न.
सावंतवाडीत रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्का...
योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्ती बद्दल विशेष सत्कार.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.