'आवडीने भावे हरीनाम घेसी..!'
'आवडीने भावे हरीनाम घेसी..!'
मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू...!
१ फेब्रुवारीला सांगता.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदिर येथे २५ जानेवारी पासून हरिनाम साप्ताहास प्रारंभ झाला. उत्सवाची सांगता १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
२५ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ व श्री दत्त गुरूंची आरती झाली. २६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत दुपारी १२.०० वाजता श्री दत्त गुरुंची आरती, रात्रौ ८.०० वाजता पंचक्रोशीतील भजन मंडळाचे वारकरी दिंडी नृत्य, रात्रौ १२.०० वाजता महाआरती, २९ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रम, दुपारी १२.०० वाजता दत्त गुरुंची आरती, रात्रौ ८.०० वाजता पंचक्रोशीतील भजन मंडळाचे वारकरी दिंडी नृत्य, रात्रौ १२.०० वाजता महाआरती व पालखी प्रदक्षिणा, ३१ जानेवारी रोजी सायं. ४.०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ, १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता अखंड हरिनाम सप्ताह सांगता व महाआरती तसेच दुपारी २.०० ते ४.०० महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
या सप्ताहाचे सर्व व्यवस्थापन देऊळवाडा, मठवाडी, वेताळटेंबवाडी, पन्हळकर टेंबवाडी, परब वायंगणी, गावठणवाडी, विकासवाडी, दत्तवाडी ग्रामस्थ करत आहेत. उपस्थितीचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे देऊळवाडा स्थानिक व मुंबई कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...