बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने 'गांधी जागर..!'
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने 'गांधी जागर..!'
३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मालवणात आयोजीत कार्यक्रमाचे तिसरे वर्ष.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने उपस्थितीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात, बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणच्या वतीने 'गांधी जागर २०२६' व्याख्यानमालेचे दिनांक ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचार काय आहेत, गांधी विचार समजून घेणे आवश्यक आहे का, पैलू काय आहेत, समकालीन वास्तवाच्या संदर्भात गांधी – आंबेडकर या उद्देशाने महात्मा गांधी जाणून घेण्यासाठी विविध वक्त्यांकडून विचारमंथन केले जाणार आहे. यंदा 'गांधी जागर'चे तिसरे वर्ष आहे, अशी माहिती बॅ. नाथ पै सेवांगण अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गुरुवार, २२ जानेवारी रोजी बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत साहित्यिक प्रवीण बांदेकर, कार्योपाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, मंगल परुळेकर व साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉ. ज्योती तोरसकर उपस्थित होते.
या व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर 'गांधी विचार आणि मी', रिंगण वार्षिकांकाचे संपादक व युवा पत्रकार श्री. सचिन परब 'गांधीजींना भावलेले तुकोबा', सद्भावना मंच संघटनेचे सुनिती सु. र., संपत देसाई, सिरत सातपुते, इब्राहिम खान व सहकारी 'गांधी आणि सामाजिक सद्भावना', एस. एम. जोशी फाउंडेशनचे विश्वस्त व समाजवादी चळवळीचे मार्गदर्शक नेते प्रा. सुभाष वारे 'गांधीजी आणि समाजवाद', शिवाजी विद्यापीठ गांधी अध्यासनाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार 'गांधी आणि जातीव्यवस्था' आणि सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वक्ते प्रा. आनंद मेणसे 'समकालीन वर्तमान आणि गांधी आंबेडकर विचार' या विषयांवर वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या मार्फत विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. यंदा तिसरा गांधी जागर होत आहे. या व्याख्यानमालेसाठी मुंबई, पुणे, विदर्भ, गोवा, कोल्हापूर, रायगड अशा विविध ठिकाणांहून रसिक श्रोते उपस्थित राहतात. या विचार जागरामध्ये स्थानिक युवक - युवती, संशोधक, विद्यार्थी व सर्वच स्तरांतील नागरिकांनी उपस्थित राहून गांधी विचारांचे महत्त्व समजून घेण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हे शिबीर निःशुल्क असून चहा, नाष्टा, भोजन आदी व्यवस्था सेवांगण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर (९४२२९४६२१२) व संजय आचरेकर (८४४६२६९७०४) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या व्याख्यानमालेत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम कडून 'छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाचा निर्णय' तातडीने मागे घ्यायची शासनाकडे मागणी.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मोफत BMD (बोन मिनरल डेन्सिटी)तपासणी शिबिर.
मालवणात लिमये हाॅस्पिटलमध्ये ४ ऑगस्ट रोजी मो...
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथील श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
रुजारिओ पिंटो यांच्या 'माॅं मेरी' हिंदी काव्यसंग्रहाचा १५ ऑगस्टला प्रकाशन सोहळा.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.