ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये 'मार्केट डे' उत्साहात. 


रानभाज्यांच्या मांडणी व विक्रीतून विद्यार्थ्यांसाठी 'आनंददायी शनिवार' साजरा करताना उद्योग - व्यवसाय विषयक व्यवस्थापनाचा अनुभव.


Article image




Article image


मालवण | प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये १८ जुलै २०२६ रोजी 'मार्केट डे' उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार साजरा करण्याच्या उद्देशाने रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे 'मार्केट डे' हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहयोगाने या 'मार्केट डे" उपक्रमाची आखणी करण्यात आली.


Article image


Article image

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची विक्री करून प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने विक्रेता आणि ग्राहक अशा जबाबदारी व भूमिका प्रत्यक्ष जाणून घेतल्या. रानभाज्यांची मांडणी, ग्राहकांशी संवाद, विक्री आणि पैशांचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळाला. या दरम्यान पालकांनी देखिल त्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


Article image

Article image

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक, प्रोत्साहक आणि प्रेरणादायी ठरला असे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांगितले.


Article image

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये, कार्यव्यग्रतेचा आनंद, काम करण्याची जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा अनुभव आविष्कार पाहायला मिळाला आणि अशा अनुभवात्मक शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संवादकौशल्य, गणिती कौशल्य व मूलभूत आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेची बीजे रुजण्यास पूरक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

Article image


Article image


या उपक्रमाला पालक वर्गाने केलेले सहकार्य दिलेला पाठिंबा आणि प्रतिसादाबद्दल रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी विशेष कृतज्ञापर समाधान व्यक्त केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स