ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

Article image


महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांची प्रमुख मार्गदर्शनपर उपस्थिती.


प्रशालेच्या 'मल्टी स्कील' फाउंडेशन कोर्सची केली विशेष प्रशंसा.



मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. 


कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निदेशक केशव भोगले यांनी प्रास्ताविकातून मल्टी स्कील शिक्षणाचे महत्त्व विशद केले, तर नेहा गवंडी यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.


यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी उपसंचालक सुनील देसाई यांनी मार्गदर्शन करताना, झपाट्याने बदलत असलेला आजच्या जगात 'उद्याची नोकरी आज अस्तित्वात असेलच' याची खात्री नाही याची जाणीव करुन दिली. त्यामुळे पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी विशेष अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय गुणांना योग्य दिशा दिल्यास उद्योजक घडविता येतो असाही, सुनील देसाई यांनी विद्यार्थ्यांना कृतीशील आग्रहाचा विश्वास दिला.


यानंतर सुनील देसाई यांनी भंडारी हायस्कूलने सन २००७ पासून विद्यार्थ्यांसाठीचा मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स हा करून दूरदृष्टीचा उपक्रम असल्याची प्रशंसा केली. बदलत्या काळातील रोजगाराच्या संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी एका शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने कॅटरिंग, इलेक्ट्रिशियन, होम सायन्स आणि इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमांमधून स्थानिक युवकांना उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्याची ताकद या मल्टी स्कील फाउंडेशन कोर्समध्ये असल्याचा विश्वासही श्री. देसाई यांनी व्यक्त केला.


या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, मल्टी स्कील फाउंडेशन कोर्सचे समन्वयक संदीप अवसरे, निदेशक केशव भोगले, जगन्नाथ आंगणे, आणि नेहा गवंडी यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमात सुनील देसाई यांचा मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांच्या हस्ते शाल - श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ आंगणे यांनी केले. कु. अनन्या अवसरे हिने आभार प्रदर्शन केले.


(जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे महत्त्व या दिवशी अधोरेखित केले जाते. यंदाचा हा दिवस 'सामायिक भविष्यासाठी कौशल्ये' या जागतिक संकल्पनेवर आधारित आहे.)



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स