ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
अक्कलकोट येथे दिनदर्शिकेचे अनावरण.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

अक्कलकोट येथे दिनदर्शिकेचे अनावरण.

प्रकाशन: 16 Jan 2026 06:24 PM
वाचन संख्या 177

अक्कलकोट येथे दिनदर्शिकेचे अनावरण. 


Article image

    



श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे यांचे आयोजन.

Article image

          

मसुरे | प्रतिनिधी :  नवीन वर्षात दिनदर्शिकेच्या रूपात स्वामींचा फोटो घरोघरी लागावा हा ट्रस्टचा संकल्प होता. त्यानुसार अक्कलकोट नगरीमध्ये सर्व भक्तांच्या उपस्थितीत स्वामी भक्त नंदकुमार पेडणेकर यांच्या हस्ते नवीन वर्षाची दिनदर्शिका ( कॅलेंडर) व दैनंदिनी (डायरी) यांचे अनावरण करण्यात आले कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन लोके यांनी ही माहिती दिली.          

Article image

श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदेच्या वतीने नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण अक्कलकोट येथे करण्यात आले. अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी मठ येथे चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्र निपुण श्री अन्नू महाराज, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष श्री महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, अक्कलकोट अन्नक्षेत्र ट्रस्टचे कार्याध्यक्ष अमोलराजे भोसले आणि सर्व भक्तांना स्वामींचे कॅलेंडर आणि डायरी भेट देण्यात आली.         


यावेळी कोकण कट्टाचे अजितकुमार पितळे, छोटा काश्मीर आरे कॉलनी मठाचे अशोक गुराम, असलदे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सचिन लोके, सचिव प्रशांत साटम, खजिनदार सौ. ज्योती जाधव, विश्वस्त प्रकाश जोईल, मधुसुधन भडसाळे, प्रकाश पावसकर, तात्या निकम आदीसह स्वामी भक्त उपस्थित होते. 

 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स