बॅरि. नाथ पै सेवांगण, मालवण संचलित व साने गुरुजी वाचन मंदिर आयोजित 'बाल - कुमार ज्ञानकोपरा' उपक्रम.
बॅरि. नाथ पै सेवांगण, मालवण संचलित व साने गुरुजी वाचन मंदिर आयोजित 'बाल - कुमार ज्ञानकोपरा' उपक्रम.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी, खालची तळाशिल येथे संपन्न कार्यक्रमात कोमसाप पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे कथा - कविता सत्र संपन्न.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणचे व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर व सहकारी कर्मचारी उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर आयोजित 'बाल - कुमार ज्ञानकोपरा' उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे कथा - कविता सत्र संपन्न झाले. मालवण तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवळी, खालची तळाशिल येथे या उपक्रमाचे बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले.
'खरा तो एकची धर्म' या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर कोमसाप केंद्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना सेवांगणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
त्यानंतर साहित्यिक वैशाली पंडित यांनी आपल्या कथा - कविता सत्रात 'गुरुदक्षिणा' कथा व कवयित्री इंदिरा संत यांची 'अक्कु बक्कुची दिवाळी' कविता सादर केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कथा, कवितेमधील संदर्भ, सादरीकरण, समजावण्याची व समजून घेण्याची पद्धत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनाने समजून घेण्याची क्षमता कशी वाढते, कल्पनाशक्ती कशी विकसित होते आणि नियमित वाचनाचा अभ्यासात तसेच व्यक्तिमत्त्व विकासात कसा उपयोग होतो, याबाबतही त्यांनी मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच वैशाली पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नांना, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
मुख्याध्यापक अमोल महाजन यांनी आभार मानताना अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांतील सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि वाचनाची रुची वाढण्यास मदत होईल असे सांगितले. बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणतर्फे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत साहित्याची ओढ पोहोचवण्याचा संकल्प स्तुत्य असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना सेवांगणच्या वतीने पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आला. तसेच शाळेला पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्यासह मुख्याध्यापक श्री. अमोल महाजन, शिक्षक श्री. विकास बडवणे, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर, सहाय्यक श्री. रवींद्र बागवे, लिपीक गौरी केळुसकर व विद्यार्थी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या ...
मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे १८ जानेवारीला सिनेमा करीअर सेमिनार.
पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय स्पर्धां उत्साहात.
पर्यटन सप्ताह मध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग मह...
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.