ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध.

प्रकाशन: 15 Jan 2026 10:35 PM
वाचन संख्या 268

शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्ज पक्ष कार्यालयात उपलब्ध. 

Article image


जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद मतदारसंघातील व १२ पंचायत समिती मतदारसंघातील इच्छुकांसाठी शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे इच्छुक उमेदवारी फॉर्म पक्ष कार्यालयात उपलब्ध आहेत. हे फॉर्म १६ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ पर्यंत मिळणार आहेत. फॉर्म घेण्यासाठीची वेळ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत व संध्याकाळी ३ ते ६ पर्यंत असणार आहे.


ज्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्यांनी इच्छुक उमेदवारी फॉर्म शिवसेना मध्यवर्ती शाखा मालवण येथून घेणे आवश्यक आहेत. विहीत वेळेत पुन्हा शिवसेना शाखेत देणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स