ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवणात नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Article image

गुरू स्मिता महाजन यांनी 'मराठीत' लिहीलेल्या व संगितबद्ध केलेल्या रचनांच्या नृत्य सादरीकरणाला भरभरून दाद.

Article image


Article image

मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या काळबादेवी एक्झाॅटिका इथल्या रंगमंचावर प्रख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना तथा नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांच्या 'नृत्यशंभो' भरतनाट्यम् कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झाॅटिका येथे या कार्यक्रमात, प्रचिती सौदागर यांच्या गुरू स्मिता महाजन यांनी 'मराठीत' लिहिलेल्या व संगितबद्ध केलेल्या रचनांवर आधारित भरतनाट्यम् नृत्य सादरीकरणाला उपस्थितांची दाद मिळाली. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर या गुरु धनश्री आपटे व गुरु स्मिता महाजन यांच्या शिष्या आहेत. 

Article image


नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांचे ज्येष्ठ बंधू श्री. प्रणव सौदागर यांनी मंचासमोर श्रीफळ वाढवले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक अभिनेत्री वैष्णवी शेटे यांनी आयोजकांच्या वतीने, श्री गणेशाला नमन व मालवणच्या ग्रामदेवतांना वंदन करुन उपस्थित सर्व रसिक मान्यवरांचे स्वागत केले. पुष्पांजलीने प्रत्यक्ष नृत्य सादरीकरण कार्यक्रमाची सुरवात झाली.


शिवकौतुक, पदम्, जतीस्वरम्, तिल्लाना अशा भरतनाट्यम् संकल्पना, कथा यांचा स्पष्टीकरणासह परिचय करुन देत नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

Article image

दरम्यान, प्रचिती सौदागर यांची खडतर नृत्य साधना व नृत्याप्रती असलेली निष्ठा याबाबत त्यांचे वडिल श्री. प्रदिप सौदागर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रचितीच्या बालपणी नृत्यविषयक प्रशिक्षणात्मक असं काही नव्हतं पण आता ती अनेक बालकांसाठी अधिकृत तसेच प्रमाणीकृत प्रशिक्षण प्रणाली घेऊन आलेली आहे याचा मालवण व परिसरातील इच्छुकांनी लाभ घ्यायचे आवाहन त्यांनी केले. प्रचिती हिला मालवणातील कला व सांस्कृतिक दर्दी रसिकांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या प्रचिती सौदागर यांची अत्यंत कमी वयात संपन्न झालेली व होत असलेली नृत्य साधना, सादरीकरणातली तंदुरुस्ती, स्वयंअध्ययन हे थक्क करुन सोडणारं असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. गुरू स्मिता महाजन यांच्या मराठीतून लिहीलेल्या रचना ह्या नर्तक व श्रोते, प्रेक्षक यांच्यापर्यंत अधिक परिणामकारक पद्धतीने पोचतायत असेही उपस्थितांनी आवर्जून सांगितले. प्रचिती सौदागर यांचा नृत्य जाणिवांसोबत रचनात्मक पद्धतीने नृत्य साक्षरतेचा ध्यास हा इच्छुकांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार असल्याचेही उपस्थित पालक वर्गाची प्रतिक्रिया होती. दरम्यान प्रचिती सौदागर यांनी इच्छुक पालक व इच्छुक नर्तकांशी वैयक्तिक संवाद साधत त्यांच्याशी भरतनाट्यम् विषयक जुजबी चर्चा केली. या कार्यक्रमाला पूरक नेपथ्य व सजावटीने विशेष लक्ष वेधून घेतले.


Article image

नृत्य विशारद प्रचिती सौदागर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलं की मालवणातील प्रत्येक इच्छुकासाठी भरतनाट्यम् नृत्याचा आनंद व अभ्यास रचनात्मक पद्धतीने विकसीत करण्याची सेवा करणे हाच त्यांचा उद्देश आहे. याबद्दल कोणालाही माहिती हवी असेल तर त्यांच्याशी 7276405929 या क्रमांकावर 'थेट संपर्क' साधता येऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Article image

सूत्रसंचालक वैष्णवी शेटे व प्रचिती सौदागर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रसिक मान्यवरांसह सहकार्य केलेल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स