आ. निलेश राणे यांचे शहर विकासाचे व्हीज़न हेच नगरसेवक पदाच्या स्विकृतीचे रीझ़न : महेश कांदळगांवकर.
आ. निलेश राणे यांचे शहर विकासाचे व्हीज़न हेच नगरसेवक पदाच्या स्विकृतीचे रीझ़न : महेश कांदळगांवकर.
स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी आ. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या विश्वासाला तडा न जाऊ द्यायची ग्वाही देऊन व्यक्त केली कृतज्ञता.
नूतन नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासकीय काळात रखडलेली कामे प्राधान्याने करून घेणे शक्य होणार असल्याचीही व्यक्त केली अपेक्षा.
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान 'स्वीकृत नगरसेवक' महेश कांदळगांवकर यांनी मालवण नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी प्राप्त करून दिल्या बद्दल आमदार निलेश राणे तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. एका विशेष प्रसिद्धी पत्राद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
प्रसिद्धी पत्राद्वारे स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर म्हणतात की, या स्वीकृत नगरसेवक पदाच्या प्राप्तीमुळे, नूतन नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासकीय काळात रखडलेली कामे प्राधान्याने करून घेणे शक्य होणार आहे.
आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ज्या विश्वासाने आणि ज्या कारणासाठी मला हे स्वीकृत नगरसेवक हे पद दिले आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अस काम मी माझ्या कालावधीत करेन याबाबत खात्री देत आहे अशी ग्वाही देखिल श्री. कांदळगांवकर यांनी दिली आहे.
'श्री. महेश कांदळगांवकर यांचा २१ वर्षांचा प्रशासकीय कर्मचारी म्हणून सेवेचा अनुभव व शहरचा अभ्यास तसेच नगराध्यक्षपदाचा ५ वर्षांचा कार्यकाल आणि त्यानंतर जवळपास ४ वर्षे प्रशासनावर अंकुश म्हणून बजावलेली माजी लोकप्रतिनिधीची भूमिका तसेच श्री. कांदळगांवकर यांची मालवण नगरपरिषदेशी संबंधित व निगडीत 'तीन दशके' आणि आता पुन्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपरिषदेशी जोडले जाणे' हे घटक आता शहरसाठी, आ. निलेश राणे यांच्या 'व्हीजन साठी रिझ़न' ठरले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.