ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या ४ एनसीसी प्रशिक्षित विद्यार्थ्यांची 'आर्मी अग्नीवीर' मध्ये निवड.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या ४ एनसीसी प्रशिक्षित विद्यार्थ्यांची 'आर्मी अग्नीवीर' मध्ये निवड.

सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या ४ एनसीसी प्रशिक्षित विद्यार्थ्यांची 'आर्मी अग्नीवीर' मध्ये निवड. 

Article image



मालवण | ब्यूरो न्यूज : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गत एनसीसी प्रशिक्षीत विद्यार्थी आदेश हाके, बिरू खरात, विवेक पाटील व शंकर पाटील या कॅडेट विद्यार्थ्यांची आर्मी अग्निवीर मध्ये निवड झाली.

Article image

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एनसीसी आर्मी विंग मधून प्रशिक्षण घेत ही कामगिरी केली आहे.


महाविद्यालयाचे विद्यमान प्रभारी प्राचार्य के. के. राबते, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. मल्लेश खोत, माजी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसीचे सर्व कॅडेट्स, प्राध्यापक वर्ग, ऑफिस स्टाफ, कर्मचारी यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आणि संबंधित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 


कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव गणेश कुशे, सहसचिव संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदू देसाई, संचालक ॲड. समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झांट्ये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खंडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कॉलेजचे एनसीसी सिनियर, एनसीसी कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस प्रमुख मारुती जगताप, मालवण तहसीलदार यांनी देखील अभिनंदन केले 


58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर तामिळनाडू, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर, सुभेदार यांनीही विद्यार्थ्यांची विशेष प्रशंसा केली आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स