जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न.
जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच त्यांची मुलगी सान्वी यांचा वाढदिवस सोहळा मालवण कुंभारमाठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने सहकारी, मित्र परिवार यांच्या उपस्थितीतील हा सोहळा लक्षणीय ठरला.
यावेळी खासदार नारायणराव राणे यांनी दत्ता सामंत यांना विशेष भाषणाद्वारे शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्गातील जनतेचे प्रेम आशीर्वाद तसेच कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर आमदार ते मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री हा प्रवास करू शकलो. याप्रवासात अनेक जिवाभावाची माणसे भेटली. या दरम्यान अनेक कार्यकर्ते घडवता आले. माझ्या जीवनात कार्यकर्ते हेच सर्वोच्च स्थानी आहेत. दत्ता सामंत हा त्यापैकी एक. साधेसरळ असे हे व्यक्तिमत्व दातृत्व गुणासह सतत जनतेची सेवा करत आहे. दत्ता सामंत यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सौ. निलमताई राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, सौ. दिव्या सामंत, सान्वी सामंत, संजय पडते, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, जिल्हा चिटणीस दादा साईल, उद्योजक दिपक परब, बाबू बिरमोळे, मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, सुरेश सावंत, मालवण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, संदीप कुरतडकर, बाळू कुबल, गजू बाकरे, शाम वाक्कर, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, अरविंद करलकर, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहरप्रमुख नगरसेवक दिपक पाटकर, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, कुडाळ शहर प्रमुख नगरसेवक अभि गावडे, आबा धडाम, तालुकाप्रमुख दीपक नारकर, संतोष साटविलकर, शाम वाक्कर, सुशांत घाडीगांवकर, दिलीप बिरमोळे, मकरंद राणे, मधुकर चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शहर संघटक राजू बिडये, पंढरीनाथ माने, माजी नगरसेवक महेश जावकर, संतोष कोदे, किसन मांजरेकर, अखिलेश शिंदे, उमेश बिरमोळे, राजा सामंत, सूर्यकांत फणसेकर, प्रसाद मोरजकर, पिंट्या गांवकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक, नगरसेविका तसेच मोठया संख्येने पदाधिकारी उपास्थित होते.
यावेळी मनोगतात श्री. दत्ता सामंत म्हणाले की, राणे साहेब हेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत. मी कायम राणे साहेबांचाच कार्यकर्ता राहणार. राणे साहेब अनेकांचे गुरु आहेत ते चालते बोलते विद्यापीठ आहेत. त्यांच्याकडून नेहमीच नवीन शिकायला मिळते. राणे साहेब तुमच्या प्रमाणे नेतृत्व आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आहे. २०२९ ला निलेश राणे यांचा सर्वात मोठा विजय हेच आमचे लक्ष आहे. आमदार निलेश राणे म्हणजे विकासाचा महामेरू आहेत. एका वर्षात मालवण कुडाळ मध्ये शेकडो कोटी विकासनिधी आमदार निलेश राणे यांनी खेचून आणला. मी जिल्हाप्रमुख म्हणून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द आमदार पूर्ण करतात. त्याच प्रमाणे पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यात काम सुरु आहे. आमचा ब्रँड राणे कुटुंब हाच आहे असे दत्ता सामंत यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना अनेक मान्यवरांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...