भंडारी ज्ञातीबांधवांच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा नागरी सत्कार.
भंडारी ज्ञातीबांधवांच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा नागरी सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण व भंडारी ज्ञातीबांधवांच्या वतीने मालवणच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार भरड येथील लीलांजली सभागृहात संपन्न झाला. भाई गोवेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालवणकर, उद्योजक चंद्रशेखर मोर्वेकर, भाई सारंग, निलेश मांजरेकर, अविनाश मालवणकर, जयप्रकाश परुळेकर, निखिल वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.
मालवण शहरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम करावे. मालवण पर्यटन केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असताना पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात यावा, भंडारी समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर व भाग्यश्री मयेकर यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन सन्मान करण्यात आला.
समाजाच्या वतीने डास निर्मूलन, वाहतूक नियोजन, कचरा व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या सुविधा या शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच मालवण एलआयसी शाखेच्या शाखाधिकारी श्रीमती सतेजा बोवलेकर यांच्या नेतृत्वाखाली शाखेने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदेश मयेकर यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्मचारी पतपेढीवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सुमित मसुरकर यांनाही गौरविण्यात आले.
यावेळी प्रदीप वेंगुर्लेकर, राजेंद्र आंबेरकर, पंकज पेडणेकर, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, देवदत्त हडकर, सागर हडकर, सचिन गवंडे, अशोक मयेकर, चिमाजी मसुरकर, बाळा सोन्सुरकर, पप्या कद्रेकर, मिलिंद झाड, विनोद बिले यांच्यासह भंडारी बांधव व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रसन्न मयेकर यांनी तर सुनील नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...