ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
ज्येष्ठ व्यापारी श्री. उमेश नेरुरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

ज्येष्ठ व्यापारी श्री. उमेश नेरुरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' जाहीर.

ज्येष्ठ व्यापारी श्री. उमेश नेरुरकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' जाहीर. 

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


जिल्हा व्यापारी महासंघातर्फे दरवर्षी कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, कै. माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार, सेवाव्रती श्री. बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा - उद्यमी पुरस्कार, कै. बी. एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामीण नवउद्यमी पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आदी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसह इतर पुरस्कारांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही नितीन वाळके यांनी स्पष्ट केले.



मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. २०००, २००८, २०१६ आणि २०२४ या चार व्यापारी मेळाव्यांचे सलग व यशस्वी आयोजन करुन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. 


श्री. उमेश नेरुरकर यांच्या कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे उमेश नेरुरकर यांना 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' जाहीर करण्यात आला असून, या निवडीबद्दल व्यापारी वर्गातून अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स