मालवणात 'दीप्ती दवे मेमोरियल सिंधुदुर्ग जिल्हा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात.
मालवणात 'दीप्ती दवे मेमोरियल सिंधुदुर्ग जिल्हा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात.
विष्णू कोरगावकर यांच्याकडून सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार.
मालवण | ब्यूरो न्यूज : महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगांवकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथील श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये ४ जानेवारी रोजी दीप्ती दवे मेमोरियल टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. मालवण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विजय कामत व विश्वस्त दिगंबर सामंत यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यांचे नुकतेच दु:खद निधन झाले ते मालवणच्या टेबल टेनिसचे आधारस्तंभ व थोर शिक्षण तज्ज्ञ बाळासाहेब पंतवालावलकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकातील टेबल टेनिस चळवळीच्या प्रणेत्या जयश्री खानोलकर - सामंत यांच्या स्मृतींना वंदन करुन तसेच श्रद्धांजली अर्पण करुन स्पर्धेला सुरुवात झाली.
ही जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा तेरा वर्षांखालील मुली - मुलगे, सतरा वर्षांखालील मुली - मुलगे, पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी अशा एकूण पाच गटांमध्ये संपन्न झाली.
या टेबल टेनिस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सतरा वर्षांखालील मुली-मुलगे विजेती वीरा वारंग व उपविजेती प्रतिभा परुळेकर, सतरा वर्षांखालील मुली-मुलगे विजेता लौकिक तळवडेकर व उपविजेती आर्या दिघे, महिला एकेरी विजेती वर्षा परुळेकर व उपविजेती आर्या दिघे, पुरुष-महिला दुहेरी विजेते ईशांत वेंगुर्लेकर व चंद्रकांत साळवे आणि उपविजेते अधिश पेडणेकर व लौकिक तळवडेकर आणि पुरुष एकेरी विजेता अर्थात या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला तो मालवणचा ईशांत वेंगुर्लेकर तर उपविजेतेपद सावंतवाडीच्या राजाराम वालावलकर याला प्राप्त झाले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना मालवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिगंबर उर्फ काका सामंत आणि डॉ. अश्विन दिघे यांच्याहस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यांमध्ये पोहोचलेल्या धनश्री परब, गौरेश घाडीगावकर, रौनक कांबळी, प्राची चव्हाण, पंकज तुळसुलकर, अतुल गवस, शुभम मुळीक या स्पर्धकांनाही आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये मालवण, कणकवली, कुडाळ , वेंगुर्ले, सावंतवाडी येथील ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इंडियन ऑइलचे सेवानिवृत्त अधिकारी उदय बेडेकर आणि अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवणच्या माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विलास परुळेकर, पावनी मालनकर, योगेश परुळेकर, वर्षा परुळेकर, आर्या दिघे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे संपूर्ण व्यवस्थापन महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर, विलास परुळेकर, खेळाडू लौकिक तळवडेकर आणि अधिश पेडणेकर यांनी केले. या स्पर्धेसाठी दिलीप हुनारी, शुभम मुळीक, पराग चव्हाण, सुजन परब, नितीन तळेकर, नितीन परुळेकर, श्यामसुंदर वारंग, सौ. मेघना वारंग, सौ. उमा दिघे, प्रशांत परब इत्यादी मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या सामन्यांचे संयोजन व सूत्रसंचालन सचिव हेमंत वालकर यांनी केले, तर अध्यक्ष विष्णू कोरगांवकर यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुले आणि मुलींच्या संघांचा सहभाग.
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्...