रुजारिओ पिंटो यांची २१ व्या जागतिक मराठी संमेलनात कविता वाचनासाठी निवड.
रुजारिओ पिंटो यांची २१ व्या जागतिक मराठी संमेलनात कविता वाचनासाठी निवड.
जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजित पणजी येथे आयोजीत तीन दिवसीय संमेलन.
ब्यूरो न्यूज : कोमसाप कविता राजधानी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांची, पणजी (गोवा राज्य) येथे आयोजीत, २१ व्या जागतिक मराठी संमेलनात कविता वाचनासाठी निवड झाली आहे. हे संमेलन ९ जानेवारी ते ११ जानेवरी २०२६ दरम्यान कला अकादमी, पणजी, गोवा येथे संपन्न होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संमेलनाचे उद्घाटक असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, गोवा राज्याचे मंत्री दिगंबर कामत यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार असून जागतिक मराठी अकादमी अधक्ष रामदास फुटाणे हे निमंत्रक आहेत. या संमेलनात उदय लाड , जयराज साळगावकर व गोवा कार्यकारिणी सदस्य आणि विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
१० जानेवारी सकाळी ९ वाजता मांडवीच्या तीरावर - या कवी संमेलनात अध्यक्ष - डॉ महेश केळुसकर सोबत गोव्यातील कवि सहभागी होतील. शनिवार १० जानेवारी संध्याकाळी ६/३० वाजता होणाऱ्या चित्र - शिल्प - काव्य - या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवि - अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, विजय चोरमारे, अंजली ढमाळ, तुकाराम धांडे, नारायण पुरी, रुजारिओ पिंटो, प्रशांत मोरे, दत्तप्रसाद जोग, चंद्रशेखर गवस, गुंजन पाटील व इतर यांचे काव्यवाचन होणार आहे.
या संमेलनात कविता वाचनासाठी कोमसाप कविता राजधानी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण मधल्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.
नेमळे येथील अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर...
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंताना सरकार दरबारी न्याय मिळवून दिल्याची दशावतार कलावंतांची प्रतिक्रिया.
आमदार निलेश राणे यांनी आम्हा दशावतार कलावंता...
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय लेखन सदराची तडाखेबंद शतकपूर्ती..!
ऋषी देसाई यांची 'नाटक मंडळी' समूहावरील परिचय ल...