मालवण नगराध्यक्षांसह शिवसेनेच्या १० नगरसेवकांच्या गटाची श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडीची स्थापना.
मालवण नगराध्यक्षांसह शिवसेनेच्या १० नगरसेवकांच्या गटाची श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडीची स्थापना.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या नवीन गटाची स्थापना केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र आणि ठरावाची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली असून या नव्या गटाला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे.
नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मालवण नगरपरिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी शहराच्या विकासासाठी आणि तांत्रिक कारणास्तव हा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाच्या गटनेतेपदी पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे.
या आघाडीत सहभागी असलेल्या नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक दिपक पाटकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा गावकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेवक ण कोयंडे, नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांच्या गट स्थापनेच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे गटनेत्या पूनम चव्हाण यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. सर्व ११ सदस्यांनी या प्रक्रियेला आपला पाठिंबा दर्शवत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गट स्थापन केल्याचे पत्र नगरविकास विभाग जिल्हा प्रशासन सहायक विनायक औंधकर यांना सादर करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...