भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ४ जानेवारी रोजी नागरी सत्कार.
भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ४ जानेवारी रोजी नागरी सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सोहळ्यात मालवण शहरच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी सकल भंडारी हितवर्धक संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, प्रदीप वेंगुर्लेकर, सचिव पंकज पेडणेकर, सहसचिव सागर हडकर, राजेंद्र आंबेरकर, जयप्रकाश परुळेकर, मिलिंद झाड, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, भाऊ साळगावकर, राजीव आचरेकर, भाऊ हडकर हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींनी मिळवलेले हे यश समाजासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्व ज्ञाती बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात एलआयसीच्या वरीष्ठ अधिकारी तथा शाखा प्रबंधक श्रीम. बोवलेकर मॅडम यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...