महसुलात वाढ झाली नसली तरी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मात्र 'वैयक्तिक महसुलात' नक्कीच वाढ ; सागर जाधव यांचा आरोप..
महसुलात वाढ झाली नसली तरी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मात्र 'वैयक्तिक महसुलात' नक्कीच वाढ ; सागर जाधव यांचा आरोप.
मनसे शहराध्यक्ष सागर जाधव यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक संदर्भात प्रशासनाला सवाल.
मनसे जिल्हा शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचीही श्री. जाधव यांची माहिती.
मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसै) शहराध्यक्ष सागर जाधव यांनी, एका प्रसिद्धी पत्राद्वारे जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक याबाबत सवाल उपस्थित केला असून ह्या अवैध गोष्टी प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असल्याच्या आरोपाचा पुनुरुच्चार देखिल केला आहे. प्रसिद्धी पत्रात श्री. जाधव यांनी याकडे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा या अवैध वाळू व्यवसायाला पाठिंबा आहे म्हणूनच वाळू व्यावसायिकांची मुजोरी वाढलेली दिसत आहे असाही आरोप केला आहे.
सागर जाधव यांच्या म्हणण्यानुसार, याबाबत अनेक वेळा आवाज उठवून सुद्धा प्रशासन सुस्त दिसत असून याला प्रमुख कारण म्हणजे प्रशासनाला असलेला राजकीय वरदहस्त, फक्त दिखाव्यापुरती कारवाई करायची आणि पुन्हा डोळेझाक करायची ही महसूल विभागाची नाटके असून आता हे सगळं 'बास झालं' ही सांगायची वेळ आली आहे असेही श्री. जाधव यांनी नमूद केले आहे.
अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले असून वाळू उपश्यविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केलीत परंतु त्यालाही या महसूल विभागाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच वाळू व्यावसायिकांकडून मलिदा खायची सवय लागल्यामुळे महसूल प्रशासन कारवाईबाबत उदासीन दिसत आहे असा गंभीर आरोप श्री. जाधव यांनी केला आहे.
गेली अनेक वर्षे अवैध वाहतूक आणि उपसा हा महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असल्यामुळे महसुलात वाढ झाली नसली तरी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मात्र वैयक्तिक महसुलात नक्कीच वाढ झालेली दिसून येते असे प्रसिद्धीपत्रात नमूद करत, सध्या जिल्हाधिकारी यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून वेळीच या सर्व गोष्टींना आळा घालावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करणार आहोत आणि लवकरच आमचे जिल्हा शिष्टमंडळ याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे मनसे शहराध्यक्ष श्री सागर जाधव यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरची विविध कामे लवकरच पूर्णत्वास.
श्री. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवण शहरच्या ...