मुंबई विद्यापीठाच्या ब्रेनबिल्ड अबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत २४८ विद्यार्थ्यांचे यश.
मुंबई विद्यापीठाच्या ब्रेनबिल्ड अबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत २४८ विद्यार्थ्यांचे यश.
मुंबई | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ब्रेनबिल्ड अबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धा २०२५ मध्ये देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांतील विविध केंद्रांमधून एकूण २४८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वेगवान गणितीय गणना, स्मरणशक्ती, एकाग्रता व अचूकता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदकं व प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन व मार्गदर्शन विश्वंभर जाधव (संशोधक व शारीरिक शिक्षण शिक्षक), लक्ष्मण धुत्रे (समन्वयक) यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी सीनियर ग्रेड व ज्युनियर ग्रेड गटांमध्ये चॅम्पियन व उपविजेते घोषित करण्यात आले.
स्पर्धेत कु. सावी कोळी हिने सीनियर ग्रेड चॅम्पियन, तर कु. तक्षशा खान हिने ज्युनियर ग्रेड चॅम्पियन म्हणून बाजी मारली. तसेच मास्टर ब्रेनबिल्ड गटात हर्ष कुमार याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशस्वी आयोजनासाठी ब्रेनबिल्ड अबॅकस प्रायव्हेट लिमिटेडचे मार्गदर्शक, प्रशिक्षक तसेच पालकांनी मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळत असून, भविष्यात अशा स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.